Pages

Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Wednesday, 19 June 2013

काहीतरी नाते नक्कीच आहे तुझ्या माझ्यात.....

काहीतरी नाते नक्कीच आहे तुझ्या माझ्यात जे दूर असूनही दुरावा वाढू देत नाही,
काय नाव द्यावे ह्या नात्याला जे मैत्रीतही प्रेमाची कमी पडू देत नाही...

Friday, 15 March 2013

प्रेम म्हणजे..........

प्रेम म्हणजे एखाद्याला गमावण्याची भीती नेहमी मनात असणे..
प्रेम म्हणजे एखाद्याला हसवण्यासाठी जीवाच रान करणे..
प्रेम म्हणजे एखाद्याच्या डोळ्यात पाणी पाहून काळजाचे पाणी होणे....
प्रेम म्हणजे एखाद्याचे केवळ सोबत राहणे हि खूप काही असणे...
प्रेम म्हणजे एखाद्याला कल्पनेच्या हि पलीकडे समजून घेणे...
प्रेम म्हणजे एखाद्याशी फक्त डोळ्यांनी बोलणे.....
प्रेम म्हणजे एखाद्याशी अतूट मैत्री असणे.....
प्रेम म्हणजे एखाद्यावर प्रेमाच्याही पलीकडे प्रेम करणे.....

Thursday, 17 January 2013

माझ्या आयुष्यात प्रेम असेल तर ते असे असावे....

माझे प्रेम मैत्रीतून फुललेले असावे...
त्याच्याशी बोलण्याची खूप ओढ असावी आणि त्याच्यासाठीच त्याच्यापासून दूर राहण्याची तयारी पण असावी...
न बोलताच त्याने मझे शब्द ऐकावे, आणि त्याला हे कसे कळले यामुळे मी आश्चर्य चकित व्हावे....
दूर असूनही त्याचे "काळजी घे" हे शब्द एवढे नितळ असावेत कि त्याच्या साठी स्वताला फुलासारखे जपावे....
त्याच्या बरोबर झालेले संवाद आठवून झोपी जावे आणि आज त्याच्या शी बोलणे होईल का  ह्या विचारात उठावे....
प्रेमात  न कधी मैत्री कमी पडावी  न कधी मैत्रीत प्रेम कमी पडावे...
माझे प्रेम हे इतरांसारखे नसावे...
लोकांना दाखवण्यासाठी केलेले नसावे....
ते फक्त एकमेकांसाठी आणि एकमेकांवर केलेले असावे....
कधी विरह स्वीकारावा लागला तर....मैत्रीतून फुललेले माझे प्रेम मैत्रीतच संपावे...!!

प्रेम आणि मी......

वेगळीच मजा असते खरे प्रेम करणार कोणीतरी मिळण्याची,
पण भीती हि असते त्या व्यक्तीला गमावण्याची.. 
आयुष्यात भेटण्याची शक्यता नसतानाही आपण प्रेम करून बसतो,
आणि नंतर एकमेकांच्या आठवणीत तो विरह खूप रडवतो...
प्रेमाची तर अशी व्याख्याच का असावी??
प्रेमात एखाद्याची अपेक्षाच का ठेवावी??
प्रेमाची सुरवात तर खूप सुंदर असते,
मग हेच प्रेम शेवटी अश्रू का ढाळते??
केलेच प्रेम तर ते असे करावे,
कि एकमेकांच्या सुखासाठी पुरून उरावे....
पण असे निस्वार्थ प्रेम सगळ्यांनाच मिळत नसते,
कारण त्यासाठी तसे नशीब असावे लागते...
जे  मने तोडेल ते प्रेमच कसे असेल??
निस्वार्थ मनाने प्रेम केले तर आयुष्य खरच खूप सुंदर दिसेल..
म्हणूनच कदाचित कुठेतरी आपल्यासाठीही अबोल प्रेम असेल,
पण आपल्याला मिळवून गमावणे मात्र  त्या प्रेमालाच पटत नसेल...!!