Pages

Showing posts with label तू. Show all posts
Showing posts with label तू. Show all posts

Wednesday, 19 June 2013

तू येणार नाही....

तू येणार नाही हे माहित असताना तुझी वाट बघण्यात एक वेगळी मज्जा आहे,
मीच मला देलीली हि एक आवडती सजा आहे !

रात्रीच्या वेळी जसे.....

रात्रीच्या वेळी जसे आकाशात चांदणे पसरावे,
तुझी साथ मिळावी मला आणि मी सगळे दुख विसरावे !

काही क्षणांसाठी....

काही क्षणांसाठी मला तुझ्या आयुष्यात यायचेय,
त्या दोन क्षणांत मला संपूर्ण आयुष्य जगायचेय !

आवडलेली प्रत्येक गोष्ट...

आवडलेली प्रत्येक गोष्ट जर मिळवावीशी वाटत असेल तुला,
तर आवड बनायला खूप आवडेल मला !

आकाशातले तारे.....

आकाशातले तारे जर माझ्या मर्जीने तुटले असते,
तर प्रत्येक तारयामागे मी तुलाच मागितले असते !

माझ्या डोळ्यामध्ये स्वप्न तुझे....

माझ्या डोळ्यामध्ये स्वप्न तुझे,
तुझ्याच नावाचा जप करते मन माझे..
तुझ्या भेटीसाठी मन आतुर झाले असे,
कि पावसाच्या एक थेंबासाठी चातकाचे झुरणे जसे !

कळत नाही....

कळत नाही तुला गमावण्याची भीती का मला वाटते,
तसे तर काहीच नाही तुझे माझे नाते !

तुझ्या माझ्या नात्याचा....

तुझ्या माझ्या नात्याचा आता कळतच नाही मला अर्थ,
तुझ्याशिवाय माझे जगणे आता वाटू लागलेय व्यर्थ !

आयुष्य आहेस माझे...

आयुष्य आहेस माझे पण आयुष्यात अजूनही नाहीस तू,
केवळ भासाभासानेच सुखावणारे एक मृगजळ आहेस तू...

तो क्षण फक्त दोघांसाठी सजलेला असावा....

तो क्षण फक्त दोघांसाठी सजलेला असावा,
हात माझा तुझ्या हातात असावा..
शब्दांशीच आपण रुसावे आणि अबोल संवाद घडावा,
गुंतावे एकमेकांत असे कि जगाचाही विसर पडावा !

Friday, 15 March 2013

माझे वेडे शब्द...

माझे वेडे शब्द माझ्यासारखाच वेडेपणा करतात,
जेव्हा वाटते  काही लिहावेसे तेव्हा तुझ्याच मागे पळतात...

तो क्षण....

तो क्षण फक्त दोघांसाठीच सजलेला असावा,
हात माझा तुझ्या हातात असावा.
शब्दांशीच आपण रुसावे आणि अबोल संवाद घडावा,
गुंतावे एकमेकात असे कि जगाचाही विसर पडावा...

आयुष्य आहेस माझे

आयुष्य आहेस माझे पण आयुष्यात अजूनही नाहीस तू,
केवळ भासा भासाने सुखावणारे एक मृगजळ आहेस तू...

काहीतरी नाते नक्कीच आहे तुझ्या माझ्यात........

काहीतरी नाते नक्कीच आहे तुझ्या माझ्यात जे दूर असूनही दुरावा वाढू देत नाही,
काय नाव द्यावे ह्या नात्याला जे मैत्रीत हि प्रेमाची कमी पडू देत नाही...

Thursday, 17 January 2013

तू हि नासमज आहेस.......

तू हि नासमज आहेस जाणून हि सगळे,
एकमेकांसाठी बनले आहोत तरी का आहोत आपण वेगळे...

मी आणि तू

किती बोलायचे आहे मला तुझ्याशी हे तुला कळणार कधी,
माझ्या मनातले शब्द तुझ्या मनात उतरणार कधी..

तू सोबत नसताना तुझ्या असण्याची  चाहूल लागते,
आणि तू सोबत असताना बोलायचे तेच राहून जाते..

नेहमीच विचार असतो तुझ्या सहवासातील क्षणांचा,
अजून किती दिवस चालणार हा खेळ आपल्या भावनांचा?

आता प्रतीक्षा आहे त्या वेळेची जेव्हा तू मी आणि मी तू होणार,
ज्यावेळी आपण दोघे वेगळे असून जणू एकच भासणार........

माझ्यापासून दूर जाशील तेव्हा ...

माझ्यापासून दूर जाशील तेव्हा  एकच काम करून जा,
तुझी कमी जाणवणार नाही असे काही तरी देऊन जा...

तुला भेटल्यानंतर....

तुला भेटल्यानंतर तुझ्या विचारांची साखळी वाढत चालली आहे माझ्या मनात...
भीती वातेय मला..कारण नाही  पडायचे आहे  मला तुझ्या प्रेमात..

न भेटता भेटी घडवत आहेस...

न भेटता भेटी घडवत आहेस...
जवळ नाहीस तरी तू माझ्याशी खूप बोलत आहेस...