Pages

Showing posts with label आठवण. Show all posts
Showing posts with label आठवण. Show all posts

Wednesday, 19 June 2013

भूतकाळात कधी रमू नये....

भूतकाळात कधी रमू नये कारण ती वेळ निघून गेलेली असते,
पण तुझ्या आठवणी आहेतच एवढ्या गोड कि मन सारखे तिकडेच वळते !

बघायचेय एकदा......

बघायचेय एकदा तुझ्यापासून दूर जाऊन,
किती आहे माझ्यासाठी ओढ तुझी...
बघाय्चेय एकदा तुला आठवणीतून काढून,
येते का तुला हि कधी आठवण माझी !

आपल्या गोड आठवणीतला एक क्षण मला आठवला..

आपल्या गोड आठवणीतला एक क्षण मला आठवला..
भान नव्हते मलाच माझे आणि तू हि होतास माझ्यात गुंतलेला..

तसे तर मी खूप विसराळू आहे.....

तसे तर मी खूप विसराळू आहे कधी कधी स्वतालाही विसरून बसते,
पण मनातून जातच नाही आठवण तुझी
कारण तुझ्यामुळेच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव होते !

Friday, 15 March 2013

आठवण तुझी..

तसे तर मी खूप विसराळू आहे कधी कधी स्वतालाही विसरून बसते,
पण मनातून जातच नाही आठवण तुझी..
कारण  तुझ्यामुळेच मला माझ्या असण्याची जाणीव होते...

Thursday, 17 January 2013

तुझी आठवण...

कधी बंद डोळ्यांनी तू हि मला पाहावेस..
जे मी कधी बोलू शकले नाही ते तू हि कधी एकावेस...
माझ्या भेटीसाठी तू हि आतुर रहावेस..
तुझे एक तरी स्वप्न माझ्या नवी करावेस...
तू हि माझ्या आठवणीत स्वताला विसरावेस..
कधी तरी मीच तुझ्यावर ओरडावे आणि तू उगाचच घाबरावेस...
तर कधी माझ्या उगाचच रागावण्यावर तू खूप हसावेस...
तुझ्याबरोबर हसता हसता डोळे भरून यावेत....
तुझ्या चांगले पणाला तू असेच जपावेस....
कोवळ्या माझ्या मनाला कधी हि न दुखवावेस...
माझ्या आठवणीना शेवट पर्यंत मनात तेवत ठेवावेस....

आठवणीत माझ्या......

आठवणीत माझ्या कधी अश्रू गळू नकोस...
आपण एकमेकांच्या हसण्याचे कारण आहोत रडण्याचे नाही...
म्हणून आठवणीत माझ्या हसणे चुकवू नकोस आणि चुकुनही रडू नकोस...!!