Pages

Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Wednesday, 19 June 2013

मैत्री तुझी माझी.....

मैत्री तुझी माझी शेवटपर्यंत अशीच राहावी,
वाटलेच जर प्रेमासारखे काही तर तुलाही त्याची जाणीव व्हावी !

मला नको पण.....

मला नको पण माझ्या आठवणीना मनात साठव,
तुझी सुखे ठेव तुझ्याच जवळ आणि दुखाना माझ्याकडे पाठव !

Thursday, 17 January 2013

खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर...

खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर तो कधी तोडू नकोस,
वाटल्यास माझे मन तोड पण माझी मैत्री कधी सोडू नकोस...

तुझ्या मैत्रीची आयुष्यभर साथ देशील का??

तुझ्या मैत्रीची आयुष्यभर साथ देशील का??
गरज पडल्यास मदतीचा  हात देशील का??
तुझ्या सुखात नको पण तुझ्या दुखात मला कधी हाक देशील का???

तुझ्या मैत्रीची साथ.....

तुझ्या मैत्रीची साथ म्हणजे कधीही न संपणारी एक वाट,
अंधाऱ्या रात्रीनंतर उगवलेली एक सुंदर पहाट...!

हीच आहे ती खरी मैत्री जी मी आत्तापर्यंत शोधत होते,
प्रेमापेक्षा हि सुंदर असे तुझे माझे मैत्रीचे नाते...!

हवाहवासा वाटणारा असा तुझ्या मैत्रीचा सहवास,
म्हणूनच तर तू आहेस माझ्यासाठी एकदम खास..!

सोन्यासारखा वाटतो तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण,
तू कुठेही जा, कुठेही रहा तुझ्यासाठी काहीपण..!

नशिबानेच मिळतात कदाचित प्रेम आणि मैत्रीची नाती,
सगळ्यांना मिळावा तुझ्यासारखा एकतरी सोबती...!

काळजी असावी तुलाही माझी रात्र असो व दिन,
कारण शोधूनही नाही मिळणार तुला माझ्यासारखी मैत्रीण..!