Pages

Wednesday, 19 June 2013

तू येणार नाही....

तू येणार नाही हे माहित असताना तुझी वाट बघण्यात एक वेगळी मज्जा आहे,
मीच मला देलीली हि एक आवडती सजा आहे !

भूतकाळात कधी रमू नये....

भूतकाळात कधी रमू नये कारण ती वेळ निघून गेलेली असते,
पण तुझ्या आठवणी आहेतच एवढ्या गोड कि मन सारखे तिकडेच वळते !

बघायचेय एकदा......

बघायचेय एकदा तुझ्यापासून दूर जाऊन,
किती आहे माझ्यासाठी ओढ तुझी...
बघाय्चेय एकदा तुला आठवणीतून काढून,
येते का तुला हि कधी आठवण माझी !

रात्रीच्या वेळी जसे.....

रात्रीच्या वेळी जसे आकाशात चांदणे पसरावे,
तुझी साथ मिळावी मला आणि मी सगळे दुख विसरावे !

काही क्षणांसाठी....

काही क्षणांसाठी मला तुझ्या आयुष्यात यायचेय,
त्या दोन क्षणांत मला संपूर्ण आयुष्य जगायचेय !

मैत्री तुझी माझी.....

मैत्री तुझी माझी शेवटपर्यंत अशीच राहावी,
वाटलेच जर प्रेमासारखे काही तर तुलाही त्याची जाणीव व्हावी !

आवडलेली प्रत्येक गोष्ट...

आवडलेली प्रत्येक गोष्ट जर मिळवावीशी वाटत असेल तुला,
तर आवड बनायला खूप आवडेल मला !