मी, माझे मन, माझा एकांत...
Pages
Home
Wednesday, 19 June 2013
तू येणार नाही....
तू येणार नाही हे माहित असताना तुझी वाट बघण्यात एक वेगळी मज्जा आहे,
मीच मला देलीली हि एक आवडती सजा आहे !
भूतकाळात कधी रमू नये....
भूतकाळात कधी रमू नये कारण ती वेळ निघून गेलेली असते,
पण तुझ्या आठवणी आहेतच एवढ्या गोड कि मन सारखे तिकडेच वळते !
बघायचेय एकदा......
बघायचेय एकदा तुझ्यापासून दूर जाऊन,
किती आहे माझ्यासाठी ओढ तुझी...
बघाय्चेय एकदा तुला आठवणीतून काढून,
येते का तुला हि कधी आठवण माझी !
रात्रीच्या वेळी जसे.....
रात्रीच्या वेळी जसे आकाशात चांदणे पसरावे,
तुझी साथ मिळावी मला आणि मी सगळे दुख विसरावे !
काही क्षणांसाठी....
काही क्षणांसाठी मला तुझ्या आयुष्यात यायचेय,
त्या दोन क्षणांत मला संपूर्ण आयुष्य जगायचेय !
मैत्री तुझी माझी.....
मैत्री तुझी माझी शेवटपर्यंत अशीच राहावी,
वाटलेच जर प्रेमासारखे काही तर तुलाही त्याची जाणीव व्हावी !
आवडलेली प्रत्येक गोष्ट...
आवडलेली प्रत्येक गोष्ट जर मिळवावीशी वाटत असेल तुला,
तर आवड बनायला खूप आवडेल मला !
आकाशातले तारे.....
आकाशातले तारे जर माझ्या मर्जीने तुटले असते,
तर प्रत्येक तारयामागे मी तुलाच मागितले असते !
माझ्या डोळ्यामध्ये स्वप्न तुझे....
माझ्या डोळ्यामध्ये स्वप्न तुझे,
तुझ्याच नावाचा जप करते मन माझे..
तुझ्या भेटीसाठी मन आतुर झाले असे,
कि पावसाच्या एक थेंबासाठी चातकाचे झुरणे जसे !
मला नको पण.....
मला नको पण माझ्या आठवणीना मनात साठव,
तुझी सुखे ठेव तुझ्याच जवळ आणि दुखाना माझ्याकडे पाठव !
कळत नाही....
कळत नाही तुला गमावण्याची भीती का मला वाटते,
तसे तर काहीच नाही तुझे माझे नाते !
तुझ्या माझ्या नात्याचा....
तुझ्या माझ्या नात्याचा आता कळतच नाही मला अर्थ,
तुझ्याशिवाय माझे जगणे आता वाटू लागलेय व्यर्थ !
आपल्या गोड आठवणीतला एक क्षण मला आठवला..
आपल्या गोड आठवणीतला एक क्षण मला आठवला..
भान नव्हते मलाच माझे आणि तू हि होतास माझ्यात गुंतलेला..
काहीतरी नाते नक्कीच आहे तुझ्या माझ्यात.....
काहीतरी नाते नक्कीच आहे तुझ्या माझ्यात जे दूर असूनही दुरावा वाढू देत नाही,
काय नाव द्यावे ह्या नात्याला जे मैत्रीतही प्रेमाची कमी पडू देत नाही...
आयुष्य आहेस माझे...
आयुष्य आहेस माझे पण आयुष्यात अजूनही नाहीस तू,
केवळ भासाभासानेच सुखावणारे एक मृगजळ आहेस तू...
तो क्षण फक्त दोघांसाठी सजलेला असावा....
तो क्षण फक्त दोघांसाठी सजलेला असावा,
हात माझा तुझ्या हातात असावा..
शब्दांशीच आपण रुसावे आणि अबोल संवाद घडावा,
गुंतावे एकमेकांत असे कि जगाचाही विसर पडावा !
तसे तर मी खूप विसराळू आहे.....
तसे
तर
मी
खूप
विसराळू
आहे
कधी
कधी
स्वतालाही
विसरून
बसते
,
पण
मनातून
जातच
नाही
आठवण
तुझी
कारण
तुझ्यामुळेच
मला
माझ्या
अस्तित्वाची
जाणीव
होते !
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)