Pages

Thursday, 17 January 2013

तुझी आठवण...

कधी बंद डोळ्यांनी तू हि मला पाहावेस..
जे मी कधी बोलू शकले नाही ते तू हि कधी एकावेस...
माझ्या भेटीसाठी तू हि आतुर रहावेस..
तुझे एक तरी स्वप्न माझ्या नवी करावेस...
तू हि माझ्या आठवणीत स्वताला विसरावेस..
कधी तरी मीच तुझ्यावर ओरडावे आणि तू उगाचच घाबरावेस...
तर कधी माझ्या उगाचच रागावण्यावर तू खूप हसावेस...
तुझ्याबरोबर हसता हसता डोळे भरून यावेत....
तुझ्या चांगले पणाला तू असेच जपावेस....
कोवळ्या माझ्या मनाला कधी हि न दुखवावेस...
माझ्या आठवणीना शेवट पर्यंत मनात तेवत ठेवावेस....

No comments:

Post a Comment